प्रसिद्ध तमिळ अभिनेता आनंद कन्नन याचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12288*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

122

प्रसिद्ध तमिळ अभिनेता आनंद कन्नन याचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि व्हिडिओ जॉकी आनंद कन्नन याचे निधन झाले. तो ४८ वर्षांचा होता. गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी असलेल्या आनंद याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यातच त्याचे निधन झाले.

तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून आनंद कन्नन ओळखला जात होता. तो दिग्दर्शक वेंकट प्रभु यांचा खास मित्र होता. नव्वदच्या दशकात त्याचे अनेक कार्यक्रम गाजले होते. टीव्हीवरील कार्यक्रमांत त्याने अँकरींगचे काम केले होते. मात्र काही दिवसांपासून कर्करोगामुळे तो रुग्णालयात उपचार घेत होता. तिथेच त्याचे निधन झाले. वेंकट प्रभू यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.