Home Breaking News टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! पहिला सामना भारत वि पाकिस्तान

टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! पहिला सामना भारत वि पाकिस्तान

0
टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! पहिला सामना भारत वि पाकिस्तान

टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! पहिला सामना भारत वि पाकिस्तान

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली- १७ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आज जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ‘ए’ आणि ‘बी’ अशा दोन गटांत ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून त्यात १६ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या ‘ब’ गटात भारताचा समावेश आहे. या गटात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलँड यांच्यासोबत भारताचे सामने होणार आहेत. त्यात २४ ऑक्टोंबरला भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्या पहिला सामना होणार आहे.

टी-२० ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात खेळवली जाणार होती. परंतु कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमनमध्ये खेळवली जाणार आहे. असे असले तरी या स्पर्धेचे यजमानपद हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आहे. या स्पर्धेत १६ देशांचे क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. ही क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ८ देशांच्या संघांमध्ये पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. ते २३ सप्टेंबरपासून सुरू होतील. त्यात बांगलादेश, श्रीलंका आणि आयर्लंड यांचा समावेश आहे. या ४ संघांमधील सुपर १२ च्या टप्प्यात पात्रता संघाची निवड केली जाणार आहे. सुपर १२ ग्रुप-२ मध्ये भारत आणि पाकिस्तान आहे. त्यांच्याबरोबरच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांचाही या गटात समावेश आहे. सुपर १२ ग्रुप २ मध्ये भारत ५ सामने खेळणार आहे. त्यापैकी ४ सामने दुबईत खेळणार आहे, तर एक अबुधाबीत खेळणार आहे. म्हणजे भारत शारजात कोणताच सामना खेळणार नाही. सुपर ग्रुप-१ मध्ये वेस्टइंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. ५ वर्षानंतर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ही स्पर्धा झाली होती. त्यावेळी वेस्टइंडीजने इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.