Home Breaking News महिलेच्या ‘त्या’ आरोपांवर आज संजय राठोड यांची साक्ष नोंदवणार

महिलेच्या ‘त्या’ आरोपांवर आज संजय राठोड यांची साक्ष नोंदवणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12277*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

39 views
0

महिलेच्या ‘त्या’ आरोपांवर आज संजय राठोड यांची साक्ष नोंदवणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,यवतमाळ – शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला होता. या आरोपाप्रकरणी बुधवारी संजय राठोड यांची साक्ष एसआयटीसमोर नोेंदवली जाणार आहे. महिलेने दिलेली साक्ष आणि संजय राठोड यांची साक्ष तपासून एसआयटी आपला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.

संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित तक्रार पीडित महिलेने घाटंजी पोलीस ठाण्याला पोस्टाद्वारे केली होती. यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आधीच वनमंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागलेले संजय राठोड यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली होती. त्यानंतर राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची नेमण्यात आली होती. या पीडित महिलेने गेल्या आठवड्यात घाटंजी पोलीस ठाण्यात येऊन आपली साक्ष नोेंदवली होती. आता याप्रकरणी उद्या संजय राठोड यांची साक्ष नोेंदवली जाणार आहे. राठोड यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर एसआयटी समिती दोन्ही साक्ष तपासून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर माध्यमांना या प्रकरणातील वस्तुस्थिती सांगितली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.