Home Breaking News तहसीलदारांना माईक फेकून मारला! आ.देवेंद्र भुयारांना ३ महिने कारावास

तहसीलदारांना माईक फेकून मारला! आ.देवेंद्र भुयारांना ३ महिने कारावास

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12273*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

142 views
0

तहसीलदारांना माईक फेकून मारला! आ.देवेंद्र भुयारांना ३ महिने कारावास

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,अमरावती –  अमरावती जिल्ह्यातील वरूडचे तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना अर्वाच्च भाषेत आईवरून शिवीगाळ आणि मारण्याची धमकी देत माईक फेकून मारल्याप्रकरणी मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्याची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला आहे. काल न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना तीन कलमामध्ये दोष सिद्ध झाल्यानंतर हा निर्णय दिला आहे.

वरुड येथे २७ फेब्रुवारी २०१३ रोजी तहसील कार्यालयात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची सभा सुरु असताना आमदार देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले. त्यानंतर तावातावाने जोरजोरात बोलू लागले की, ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे. माझा फोन का कट केला अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी तहसीलदार राम लंके यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देऊन माईक फेकून मारला अशी तक्रार तहसीलदार राम लंके यांनी २७ फेब्रुवारी वरुड पोलिसात दाखल केले होते. या प्रकरणात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये दाखल केलेल्या तक्रारीत गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने सक्त मजुरी आणि १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी एक महिना साधा कारावास दोन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली.दरम्यान, अशा प्रकारचा दररोज एक गुन्हा दाखल केला तरी तो मला मान्य आहे. मी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत प्रयत्न करणारच राहीन.तसेच न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.