स्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12265*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

790

स्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण

विदर्भ वतन,नागपूर-75 वा स्वातंत्र्य दिन आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. याचेच अवचैत्य सादत नेहरू युवा केंद्र ,नागपूर शिवसाम्राज्य ग्रुप उमरेड यांच्या तर्फे उमरेड तालुक्यातील आमगाव व तिरखुरा गावात 75 वृक्षाचे रोपण करण्यात आले. या मध्ये फळ झाडे, वड, पिंपळ, उंबर इत्यादी झाडे लावण्यात आली. निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, आपल्याला निसगार्चं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या स्थरावर वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन शिवसाम्राज्य ग्रुप चे अध्यक्ष मोनिष महेंद्र अठ्ठरकर यांनी केले .
स्वयंसेवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धना बदल जनजगृती केली
या उपक्रमाची यशस्वी ते करीता नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक प्रतीक अठ्ठरकर दिलीप कोल्हे, सोहन उरकुडे, सुरज मोहूले, आकाश जिभकाते,गजानन लडी, प्रवीण कोल्हे, अनिकेत शेंडे, महेश कोल्हे, तेजस मोहूले, मच्छिंद्र कोल्हे, कैलास मोहूले,सीता अरतपायले,सेजल दुढेकर, वांशिक येवले, शुभांगी लांमसोंगे, रुचिता झोडापे, पल्लवी बनकर, जानवी सवाईमुल, नैनिका वाघमारे, सुहानी वाघमारे,अक्षता बनकर, साक्षी नाकडे, मयुरी बनकर इत्यादी सहकार्य करत आहेत