स्वामीदर्शन महानुभाव मंडळाद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन

विदर्भ वतन,नागपूर-स्वामीदर्शन महानुभाव मंडळाद्वारा कै रावसाहेब म. ग. ठवरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक श्री किशोर कुमरिया यांच्या हस्ते झाले.
रक्तदानाची सर्व जबाबदारी जीएसके रामदास पेठ यांनी पार पाडली. तर आर्या कार्सच्या कर्मचा-यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून परम पूज्य महंत श्री. विश्वनाथ बाबा कपाटे मनसर व साजनकुमार शेंडे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी परम पूज्य महंत खांदारकर बाबा यांनी भूषविले.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर बोरकर, देवराव मोटघरे, कलासुवा, सौ. पुष्पा मोटघरे, मनोज बोरकर, मनपा कर्मचारी पंकज, चव्हाण व भाकरे मॅडम या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आणि प्रास्ताविक प्रभाकर चंदनखेडे तर संचालन विकी कलासुवा यांनी केले तर आभार ताम्रध्वज खोब्रागडे यांनी मानले होते.

You missed