लंडनच्या पुलावर झळकला बॅनर; मोदींच्या राजीनाम्याची मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12245*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

117

लंडनच्या पुलावर झळकला बॅनर; मोदींच्या राजीनाम्याची मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : लंडन – भारत देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अमृतमहोत्सवी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लाल नवी दिल्लीत किल्ल्याच्या बुरुजावरून पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. मात्र त्याचवेळी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांनी घोषणाबाजी करत मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा बॅनर झळकवला. लंडनच्या वेस्टमिन्टर पुलावर हा बॅनर लावण्यात आला होता. त्यामध्ये ‘रिझाईन मोदी’,असा मजकूर त्यांनी लिहिला होता.

युनायडेट किंगडममधील डायस्पोरा गटाच्या भारतीय नागरिकांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आपला विरोध दर्शवला. या ग्रुपने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात आपल्या या निषेधाबद्दलची अनेक कारणे दिली आहेत. त्यामध्ये, धार्मिक तेढ, शेती क्षेत्राचे कॉर्पोरेटीकर, कोरोना हाताळण्यात आलेले अपयश, काश्मीरमधील भारताचा वसाहतवाद यांसह अनेक कारणांचा उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे. या गटाने युकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर मेणबत्ती लावूनही मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून ट्विटरवर ‘रिझाईन मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.