शिलॉंगमध्ये संपूर्ण संचारबंदी; मोबाईल, इंटरनेट सेवा बंद राहणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :

122

शिलॉंगमध्ये संपूर्ण संचारबंदी; मोबाईल, इंटरनेट सेवा बंद राहणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : शिलॉंग – मेघालयचे गृहमंत्री लहकमान रिंबुई यांनी शिलाँगमध्ये पोलीस चकमकीत दहशतवाद्याच्या हत्येवरून झालेल्या हिंसाचारादरम्यान राजीनामा दिल्यानंतर शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चार जिल्ह्यात मोबाईल आणि इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी ईशवंदा लालू यांनी काल रविवारी रात्री ८ वाजेपासून शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी जाहीर केली आहे.

शहरातील परिस्थिती तणावपूर्ण राहिल्याने काही भागात तुरळक हिंसक घटना घडल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा आदेश पूर्व-पक्षीयरित्या काढण्यात आला असून १७ ऑगस्टच्या सकाळी ५ वाजेपर्यंत आदेश लागू राहणार आहे.’ आतापर्यंत दगडफेक, जाळपोळ आणि चोरीच्या घटना घडल्या आहेत.शिलाँग शहरातील काही भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.शांतता भंग करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीच्या घटना घडू शकतात,अशा परिस्थितीत शहर आणि जिल्ह्याच्या इतर भागात हिंसा पसरण्याची शक्यताही या आदेशातून वर्तविण्यात आली आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्र, संपूर्ण कॅन्टोन्मेंट क्षेत्र, मावपत ब्लॉकचे सर्व क्षेत्र, माईलीम ब्लॉक अंतर्गत उमशीर्पी पुलापासून ७ व्या मैलापर्यंत अप्पर शिलाँगचे क्षेत्रामध्ये संचारबंदी लागू असणार आहे. दरम्यान, मेघालय सरकारने मोबाईल, इंटरनेट व व्हाट्सएप एसएमएस, फेसबुक सेवा शिलाँगच्या काही भागात ४८ तासांसाठी बंद केल्या आहेत.