काबूल विमानतळावर भयंकर गर्दी, टेक ऑफ करताना अनेकांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12236*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

104

काबूल विमानतळावर भयंकर गर्दी, टेक ऑफ करताना अनेकांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : काबूल – तालिबानने देश ताब्यात घेतल्याने अफगाणिस्तान सोडण्यासाठी हजारो अफगाणी नागरिक काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमा झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये अराजकतेचे वातावरण आहे. काबूलमध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. इथल्या प्रत्येक परदेशी व्यक्तीला बाहेर जायचे आहे. यामुळेच काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी जमली आहे.

काबूल विमानतळ सध्या अमेरिकी सैन्याच्या ताब्यात आहे, पण प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. कोणतीही सुरक्षा तपासणी चालू नाही. लोक विमानात चढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काही जणांनी टेक-ऑफ दरम्यान स्वतःला विमानाच्या चाकांवर बांधून घेतले होते. टेक-ऑफ नंतर काही वेळाने हे लोक खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या लोकांचे मृतदेह आता छतांवर सापडत आहेत. तेहरान टाइम्सने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काबुलवर एक विमान उडताना दिसत आहे. तसेच या विमानातून दोन लोक खाली पडताना दिसत आहेत.