अनिल देशमुखांना मोठा झटका; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12226*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

172

अनिल देशमुखांना मोठा झटका; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉँड्रींग तसेच शंभर कोटींच्या वसुली प्रकरणी ईडीने अनेकदा समन्स बजावले होते. मात्र समन्स बजावूनही देशमुख यांनी काही कारणे देत चौकशीला उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली होती. या पार्श्‍वभूमीवर ईडीने कारवाई करु नये यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. ही याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे.

अनिल देशमुख यांनी अटकेची कारवाई टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेत ईडीच्या तपासाला स्थगिती द्यावी, ईडीकडून पाठवण्यात आलेले समन्स रद्द करावे, अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मज्जाव करावा, अशा मागण्या करत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाचे न्या. एम.एम.खानविलकर, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी खंडपीठाने कायदेशीर उपाय फक्त कायदेशीर तरतुदींनुसारच करता येतात. देशमुख यांनी इतर उपलब्ध पर्यायांचा वापर करावा, अटक टाळायची असेल तर त्यांनी रीतसर अटकपुर्व जामिनाठी कोर्टात याचिका करावी. त्यावर मुंबईतील स्थानिक न्यायालय निर्णय घेते. आम्ही तुम्हाला कुठलाही दिलासा देऊ शकत नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने अनिल देशमुख यांचा शेवटचा पर्यायही बंद झाल्याचे बोलले जात आहे.