भारतीय कर्मचारी मजदूर युनियनतर्फे स्वातंत्र्यदिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन

109

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिनानिमीत्त भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष निसर्ग भावधारा परिषद प्रमिला राऊत, राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच निसर्ग भावधारा सचिव वसंतराव भगत, विदर्भ अध्यक्ष गिता महाकाळकर, भारतीय कर्मचारी मजदूर युनियन उपाध्यक्ष प्रमिला ठाकुर, निधी बँंकेचे संचालक राजेंद्र मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता तसेच निसर्ग भावधारा परिषद सचिव कल्पना जोगे, यांच्यासह नगरसेवक मनोज गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगित गायन केले तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली़ कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व अध्यक्षांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ बुटले गुरूजी, प्रविण देशपांडे, कवाडकर यावेळी उपस्थित होते़