
स्वातंत्र्याचा अमृतोत्सव
भव्य दिव्य या देशाच्या
गौरवाची सांगावी कथा
स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवी
उलघडावी जीवनगाथा ।।
देशासाठी त्याग करणारे
किती होऊन गेले हुतात्मे
स्वप्नांतील भारत घडवण्या
होते प्रतिभावान शास्त्रज्ञे ।।
स्वातंत्र्याच्या लढ्यात होते
नवयुवकांचे योगदान
व्यर्थ न जाणार कधीही
शहिदांचे बलिदान ।।
पोशिंदा शेतकरी राजा
इमानाने तो वागला
अर्थव्यवस्था सुधारण्या
कष्टाने शेतीत राबला ।।
साहित्य असो वा राजकारण
तीने गगनभरारी घेतली
चुल नी मुलं सांभाळणारी
आज चौकट तीने भेदली ।।
एकात्मता जपणारा भारत
पंच्याहत्तरीच्या उंबरठ्याशी आला
तरुणांचा देश म्हणोनि
सार्या जगात प्रसिद्ध झाला ।।
काही न करता नव्या पिढीला
जरी स्वातंत्र्य आयते लाभले
स्वातंत्र्याचे जतन, रक्षण करणे
प्रथमत: हेच कर्तव्य आपले ।।
– निलेश दि तुरके
आटमुर्डी ता राळेगाव जी यवतमाळ
७७४१८७७१७४

