आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विदर्भात फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे विविध शहरांत आयोजन -युवकांचा उत्स्फुर्त सहभाग

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12208*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

204

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विदर्भात फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे विविध शहरांत आयोजन
-युवकांचा उत्स्फुर्त सहभाग

विदर्भ वतन,नागपूर-आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत फीट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा आजपासून देशभरात प्रारंभ झाला. विदभार्तील वर्धा, अकोला , गोंदीया, वाशिम येथे केंद्र सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केद्रातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वस्थ भारताचा संकल्प केला तर श्रेष्ठ भारत घडेल असे प्रतिपादन वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा, रजनीश कुमार शुक्ल यांनी केले. ते ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत आज स्थानिक मेजर ध्?यानचंद क्रीडांगणात ह्यफिट इंडिया फ्रीडम रन 2.0ह्ण कार्यक्रमाचे उदघाटन करतांना बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा नगर पालिकेचे अध्यक्ष अतुल तराळे उपस्थित होते.
कोरोनाने जगाला आरोग्याच्या दृष्टीने कमजोर केले आहे. कोरोना पासून कसे दूर राहू शकतो याचा ह्यफिट इंडियाह्ण अभियान हा एक सशक्त मार्ग आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ह्यफिटनेसचा डोज, अर्धा तास रोजह्ण या आहवाना अंतर्गत रोज अर्धा तास आपल्या शरीराकडे लक्ष्य देण्याची गरज आहे , असे शुक्ल यावेळी म्हणाले. कार्यक्रमात विद्यापीठाचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्योने सहभागी झाले होते.
वर्ध्यामध्ये आयोजित फिट इंडिया फ्रीडम रनला खासदार रामदास तडस यांनी हिरवा झेंडा दाखवला. हुतात्मा स्मारक ते सेवाग्राम आश्रम बापु कुटी सेवाग्राम आश्रम पर्यंत या रनचं आयोजन केलं होतं. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

गोंदियात सडक अजुर्नी तालुक्यातल्या कणेरी गावात स्वातंत्र्य सैनिक कन्यालालबापू दीक्षित यांचा निवासस्थानाहून फिट इंडिया फ्रिडम रन काढली गेली. यावेळी दिक्षित यांच्या प्रतिमेला पुष्पांजलीचा कार्यक्रमही आयोजित केला होता. कन्यालाल यांचे पुत्र रामदत्त कन्यालाल दीक्षित यांनी रन ला हिरवा झेंडा दाखवला.


अकोल्यात नेहरू युवा केंद्र आणि सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयानं संयुक्तपणे फिट इंडिया फ्रीडम रनचं आयोजन केलं होतं. या मोहिमे अंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या ७५ गावांमध्ये २ आॅक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवाडा तसंच कोरोना जनजागृतीविषयक उपक्रमही राबवले जाणार आहेत.
वाशीम इथूनही आज फिट इंडिया फ्रीडम रन निघाली. यावेळी वाशिम नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी शारिरिक तंदुरुस्तीची शपथही घेतली.