Home Breaking News गजनी, हेरातनंतर कंदहार! १ दिवसात तालिबानने बदलला अफगाणचा नकाशा

गजनी, हेरातनंतर कंदहार! १ दिवसात तालिबानने बदलला अफगाणचा नकाशा

0
गजनी, हेरातनंतर कंदहार! १ दिवसात तालिबानने बदलला अफगाणचा नकाशा

गजनी, हेरातनंतर कंदहार! १ दिवसात तालिबानने बदलला अफगाणचा नकाशा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : काबुल – नाटो आणि अमेरिकन लष्कर अफगाणिस्तानातून निघून गेल्यानंतर आक्रमक झालेल्या तालिबानने आज अफगाणिस्तानमधील दुसरे सर्वात मोठे शहर कंदहारवर कब्जा केला आहे. त्यानंतर त्याच्या शेजारच्या लष्कर गाह शहरावरही कब्जा केला. त्यामुळे एका दिवसात तालिबानने अफगाणिस्तानचा नकाशाच बदलला आहे. यामुळे आता अफगाणिस्तानातील अनेक मोठ्या भागांवर तालिबानचा कब्जा आहे.

तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. त्यात शुक्रवारी तालिबानने काबुलजवळच्या कंदहार शहराचा कब्जा घेतला. कंदहार अफगाणिस्तानातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. त्यानंतर त्यांनी लष्कर गाह शहरावरही कब्जा केला आहे. आता ते काबुलच्या दिशेने पुढे सरकत आहेत. मात्र आतापर्यंत तरी अफगाण सेनेला काबुल ताब्यात ठेवणे शक्य झाले आहे. गुरुवारी रात्री तालिबान्यांनी कंदहार शहरावर ताबा मिळवला. त्यावेळी तेथील सरकारी अधिकारी आणि इतर विमानाने पळून गेले. तालिबानने यापूर्वी गजनी आणि हेरात या दोन प्रांतीय राजधान्यांच्या शहरांवरही कब्जा केला आहे.