माझे राजकीय जीवन संपवण्याचे षडयंत्र, संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12186*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

160

माझे राजकीय जीवन संपवण्याचे षडयंत्र, संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : औरंगाबाद- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते संजय राठोड हे अजून एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत. संजय राठोड यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करुन लैैंगिक छळ केल्याचा आरोप करत एका महिलेने यवतमाळ पोलिसांकडे तक्रार केली होती. या महिलेच्या आरोपांना संजय राठोड यांनी आज पत्रकार परिषद घेत फेटाळून लावले. खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपवण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. मात्र अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही. या आरोपांची चौकशी करा सत्य समोर येईल, असे राठोड यांनी सांगितले.

संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, यवतमाळ जिल्ह्यातील पहूरनजीक शिवपुरी येथे छत्रपती शिवाजी कला शिक्षण विकास कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान ही संस्था आहे. या संस्थेचा मी सचिव होतो. संस्थेतील तीन शिक्षकांना अनियमिततेच्या कारणावरुन 2017 मध्ये निलंबित करण्यात आले होते. या शिक्षकांनी समाज कल्याण विभागाकडे दाद मागितली. त्यानंतर आयुक्तांकडे प्रकरण गेले. या दोन्ही ठिकाणी संस्थेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात दाखल झाले. दरम्यानच्या काळात शिक्षकांअभावी विद्याथ्यार्र्ंचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरुपावर तीन शिक्षकांना संस्थेने नियुक्ती दिली. यातील एका शिक्षकाने स्वतःहून राजीनामा दिला. तसे पत्रही संस्थेकडे आहे. हाच शिक्षक पुन्हा संस्थेमध्ये घेण्याची मागणी करीत आहे. यावर न्यायालयाचा जो काही निर्णय येईल त्यानंतर याबाबत ठरवू असे मी त्याला स्पष्ट केले. मात्र माझ्यावर तसेच संस्थेवर विविध प्रकारे दबाव आणण्यात येऊ लागला.

दरम्यानच्या काळात फेब्रुवारीतील प्रकरणानंतर माझ्यावर बदनामीकारक आरोप सुरु झाले. विविध पाच निनावी मोबाईल क्रमांकावरून मला धमक्यांचे फोनही आले. संजय जैस्वाल या संस्थेतील मुख्याध्यापकाला नामसाधर्म्यामुळे धमकीचे मॅसेज आले. त्यामुळे 24 मे रोजी वडगाव पोलीस ठाण्यात जैस्वाल यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तुझे राजकीय अस्तित्व संपवू असे मॅसेज मला आले. त्यामुळे 27 जुलै रोजी यवतमाळ शहरातील अवधुतवाडी ठाण्यात याबाबत मी तक्रार केली आहे. याच प्रकरणाचा आता राजकारणासाठी वापर केला जात आहे. अत्यंत खालच्या थराला जाऊन सध्या राजकारण केले जात आहे. मी आणि माझे कुटुंबीय मागील प्रकरणात कोणत्या मानसिकतेतून गेलो असेल याची कल्पना करावी आणि अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही, असे सांगत राठोड यांनी या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर यावे अशी इच्छा असल्याचे सांगितले. पोलीस अधिक्षकांनाही त्याबाबत सांगितले आहे. महिलांना पुढे करुन सदर प्रकरणाचा आता राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोपही यावेळी राठोड यांनी केला.

दरम्यान, संजय राठोड यांनी आरोप फेटाळून लावल्यानंतर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या संजय राठोडवर आणखी एक गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला. त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत. तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पहातोय? अशी तालीबानी प्रवृत्ती या महाराष्ट्रात महिलांनी कधी अनुभवली नव्हती जिची ठाकरे सरकारच्या काळात अनुभूती मिळतेय, असा घणाघात केला.