ड्रग्ज तस्करांकडून एनसीबीच्या अधिकार्‍यांवर हल्ला, 5 जण जखमी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12177*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

161

ड्रग्ज तस्करांकडून एनसीबीच्या अधिकार्‍यांवर हल्ला, 5 जण जखमी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – गेल्या आठवड्यात पोटातून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या दोन विदेशी नागरिकांना अटक केल्यानंतर एनसीबीने काल रात्री आणखी एक मोठी कारवाई केली. एनसीबीने वाशी, नवी मुंबईत ड्रग्ज तस्कारांवर कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाई दरम्यान ड्रग्ज तस्कर टोळीकडून एनसीबीच्या अधिकार्‍यांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एनसीबीचे 5 अधिकारी जखमी झाले असून एका अधिकार्‍याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, वाशी ते नवी मुंबई भागात ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीच्या अधारे आमच्या अधिकार्‍यांनी रात्री उशीरा संबंधित ठिकाणी छापा टाकला. पण ड्रग पेडलरनी आमच्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे 5 अधिकारी जखमी झाले आहेत. तर एका अधिकार्‍याची प्रकृती गंभीर आहे. या कारवाई दरम्यान ड्रग्ज तस्कर खारफुटीच्या झाडांची मदत घेत फरार झाले. फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून एनसीबीने ड्रग्ज तस्कर टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. तसेच यावेळी अधिकार्‍यांनी एक विदेशी निर्मितीचे हत्यारही जप्त केले असून या कारवाईत एनसीबीने जवळपास 1 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असल्याची माहितीही वानखेडे यांनी दिली.