दोन डोसनंतरही डेल्टाची दहशत; ८७ हजार जणांना इन्फेक्शन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12172*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

171

दोन डोसनंतरही डेल्टाची दहशत; ८७ हजार जणांना इन्फेक्शन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – देशात कोरोना प्रतिबंधक लसी टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनाची लस हा एकमेव उपाय असल्याचे सांगितले जात असले, तरी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. विशेषतः जगभरात अनेकांना लसीकरणानंतर डेल्टा व्हेरियंटची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. लसीकरणानंतरही संसर्ग देशातील आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या डोस घेतलेल्या १ लाख ७१ हजार ५११ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ८७ हजार ४९ जणांना कोरोनाच्या विषाणूची बाधा झाल्याचं सांगण्यात आले आहे.

सर्व लसींबाबत सारखाच अनुभव देशातील बहुतांश नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे. त्याखालोखाल कोव्हॅक्सिन आणि सर्वात कमी संख्या स्पुटनिक-व्ही ही लस घेतलेल्या नागरिकांची आहे. मात्र या तिन्ही लसी घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे.यामध्ये डेल्टा व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये लसीकरण झालेल्यांचंही लक्षणीय प्रमाण असल्याचं दिसून आलं आहे. मात्र लसीकरण झालेल्या रुग्णांना ते न झालेल्यांच्या तुलनेत कमी त्रास होत असल्याचंही दिसून आलं आहे. दरम्यान,लस घेण्याचं आवाहन लसीकरण झाल्यानंतर कोरोना व्हायरसची लागण होणार नाही, अशी खात्री कुणीच देत नसून लागण झाली तरी त्याविरुद्ध लढण्यासाठीची रोगप्रतिकारशक्ती शरीरात निर्माण करणं, हा लस घेण्यामागचा मुख्य हेतू असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं आहे.