Home Breaking News आधार कार्ड आणि पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

आधार कार्ड आणि पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12167*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

116 views
0

आधार कार्ड आणि पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – आधारकार्ड, पॅनकार्ड जन्मतारखेचा वैध पुरावा नाही, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. शाळेच्या दाखल्यावरची जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल, असे आपल्या निकालात म्हटले आहे.

आधारकार्ड पॅनकार्डच्या माध्यमातून जन्मतारखेचा दाखला ग्राह्य धरता येणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. वय ठरवण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाऊ शकते, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मेरठमधील एका सुनावणीत न्यायमूर्ती रोहित राजन अग्रवाल यांनी हा निकाल दिला. एका दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा निकाल दिला आहे. लग्नासंदर्भातील या याचिकेमध्ये अर्जदारांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आपण सज्ञान होतो, त्यामुळेच न्यायालयाने आमचा जगण्याचा आणि खासगी स्वातंत्र्याच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी केली. तसेच इतर कोणीही आमच्या खासगी वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करु नये, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, संबंधित मुलीच्या आईने न्यायालयासमोर दिलेल्या जबाबामध्ये शाळेच्या दाखल्यावरील तारीख योग्य असल्याचा आधार घेत न्यायालयाने शाळेच्या दाखल्यावरील तारीख बरोबर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आधारकार्डवरील किंवा वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालाला प्राधान्य देता येणार नाही. २०१९ मधील एका निकालाच्या आधारे आधार कार्ड हा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचे न्यायालायने स्पष्ट केले.