अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात शिवडी पोलिसात तक्रार दाखल

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12160*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

136

अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात शिवडी पोलिसात तक्रार दाखल

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – टीव्हीवरील आगामी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे हा अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण अद्वैत थिएटर या नाट्यनिर्मिती संस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट चोरीला गेला असून त्याचा कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या व्यावसायिक कारणासाठी वापर केल्याची तक्रार श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्याविरोधात शिवडी पोलीस ठाण्यात केली आहे.‘कोरोनामुळे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या काळाचौकी येथील गोदामात ठेवण्यात आला होता. मात्र तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता श्रेयस तळपदे व सुरेश सावंत यांनी गोदाम मालकास खोटे सांगून गोदामातून चोरून ‘भक्षक’ या एकांकिकेच्या चित्रीकरणासाठी वापरला आहे’, असे भंडारे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तळपदे यांच्या ‘नाइन रसा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही दिवसांपूर्वी ‘भक्षक’ या एकांकिकेचे चित्रीकरण दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झाले. या चित्रीकरणावेळी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट वापरण्यात आल्याचे नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाशी निगडीत सर्व सेट हा अद्वैत थिएटर संस्थेची ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी’ असून ती आमच्या परवानगीशिवाय वापरली असल्यामुळे हे चित्रीकरण कुठेही प्रदर्शित करू नये; अन्यथा ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स’ अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’ तर दुसरीकडे श्रेयस तळपदे याने मात्र त्या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी संबंधित नाटकाच्या निर्मात्यांची असते. त्यामुळे माझे नाव यात गुंतवून माझी बदनामी करण्याचा किंवा माझ्या नावाचा प्रसिद्धीसाठी वापर करण्याचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.