तालिबानींची जोरदार मुसंडी! काबुलजवळच्या गजनीवर ताबा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12150*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

182

तालिबानींची जोरदार मुसंडी! काबुलजवळच्या गजनीवर ताबा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : काबुल – अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर तालिबान पुन्हा आक्रमक झाले आहे. त्यात त्यांनी अनेक प्रांतांच्या राजधान्या काबीज करण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांनी आतापर्यंत १० प्रांतांच्या राजधान्यांच्या प्रमुख शहरांवर कब्जा केला आहे. काबुलपासून १५० किलोमीटरवर असलेल्या गजनी शहरावर तालिबानने कब्जा केला आहे. यामुळे काबुलवर ते कधीही कब्जा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान्यांची राजवट अमेरिकन सैन्याने उलथून टाकली होती. त्यानंतर अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्राचे सैन्य अफगाणिस्थानमध्ये होते. या काळात तालिबान्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या. परंतु हे सैनिक मायदेशी परतताच तालिबान आणि अफगाण सेनेमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. त्यात तालिबानने अनेक प्रमुख शहरांवर कब्जा करण्याचा सपाटा लावला आहे. आठवडाभरात त्यांनी किमान १० प्रांतांच्या राजधान्यांची शहरे काबीज केली आहेत. यात त्यांनी आता गजनी शहरावर कब्जा केला असल्यामुळे त्यांचे पुढील लक्ष्य काबुल असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.