Home Breaking News बीडमध्ये युवा सेनेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी; वरून सरदेसाईंकडून कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी

बीडमध्ये युवा सेनेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी; वरून सरदेसाईंकडून कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी

0
बीडमध्ये युवा सेनेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी; वरून सरदेसाईंकडून कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी

बीडमध्ये युवा सेनेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी; वरून सरदेसाईंकडून कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : बीड – कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या बीडमध्ये शिवसेनेच्या युवा संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. जिथे कोरोनाचे निर्बंध कडक आहेत, अशा बीडमध्ये शिवसेनेकडून कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी नसताना नाट्यगृहातचं शिवसेनेकडून भाषणबाजी करण्यात आली असून हजारो युवा सैनिकांनी संवाद दौऱ्याला उपस्थिती लावली होती.

यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत, मास्क न लावता हजर राहिल्यामुळे कोरोना बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे नियम कोणासाठी आहेत? असा प्रश्न निर्माण होत आहे. युवासेना सचिव वरूण सरदेसाई मराठवाड्याच्या संवाद दौर्‍यावर आहेत. आज त्यांचा दौरा बीडमध्ये होता, दरम्यान यावेळी सरदेसाई यांनी सेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून नाट्यगृह, सिनेमागृह, धार्मिक स्थळ आणि सामूहिक कार्यक्रमास बंदी असताना युवा सेनेकडून शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कोरोना नियमांचा फज्जा उडवत संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमासंदर्भात सचिव वरूण सरदेसाई यांना विचारले असता हाच नियम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदींना का लावला नाही, तो लावला असता तर दुसरी लाट आली नसती, निवडक कार्यकर्ते घेऊन हा मेळावा होत आहे असे ते म्हणाले.