आॅनर किलींगने हादरले ग्वालियर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12136*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

134

आॅनर किलींगने हादरले ग्वालियर

-आंतरजातीय विवाह केल्याने मुलीला कुटुंबीयांनी संपविले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :ग्वालियर- दुसर्‍या जातीतल्या तरुणावर प्रेम करून त्याच्याशी लग्न केल्याच्या रागातून वडील, भाऊ आणि चुलत्यांनी तरुणीचा खून केल्याचे उघड झाले आहे. लग्नानंतर माहेरी आलेल्या तरुणीला फाशी देऊन या तिघांनी मारून टाकले. वडिलांनी तिचे हात पकडले, तर भाऊ आणि काकांनी तिच्या गळ्यात फाशीचा फंदा अडकवून तिला फासावर लटकवले. ऑनर किलिंगच्या या घटनेने देशाला धक्का बसला आहे.
मध्यप्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यातल्या जनकगंजमध्ये राखी राठोड या २0 वर्षांच्या तरुणीने फाशी घेतल्याच्या बातमीनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली.
राखीच्या गळ्यात असणारा फासाची गाठ ही वेगळ्या पद्धतीने बांधण्यात आली होती. स्वत: फाशी घेणारी व्यक्ती अगोदर फंदा तयार करते आणि त्यात आपली मान घातले. राखीच्या गळ्याभोवती मात्र फाशीचा फंदा अगोदर गुंडाळला गेला आणि नंतर त्याला गाठ मारली गेल्याचे दिसून आले. शिवाय ज्या ठिकाणी साडी बांधून ही फाशी घेण्यात आली, ती जागा खूपच उंचावर असल्याचे पोलिसांना जाणवले.
इतक्या उंचीवर राखीचा हात सहसा पोहोचणार नसल्याचे गृहित धरून दुसर्‍या कुणीतरी या जागी साडी लटकवली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी राखीचा भाऊ जितेंद्र आणि वडील राजेंद्र यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आपणच तिचा खून केल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली. राखीचे दुसर्‍या जातीच्या मुलावर प्रेम होते. ५ जूनला घरातील काही पैसे आणि दागिने घेऊन पळून जाऊन तिने त्या मुलासोबत लग्न केले होते.
माहेरच्यांना घाबरत घाबरत दोन महिन्यांनंतर ती माहेरी आली होती. मात्र घरच्यांचा राग शांत झाला नव्हता. मुलगी घरी आल्याची संधी साधत तिघांनी तिला फासावर लटकवून तिची हत्या केली. धक्कादायक म्हणजे क्राईमवर आधारित टीव्ही मालिका पाहून आपण ही योजना आखल्याचे तिघांनी सांगितले.