बायको असावी तर अशी…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12131*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

160

बायको असावी तर अशी…

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : हैदराबाद-पती म्हणजे परमेश्‍वर असे म्हटले जाते. किती तरी महिला तसे मानतातही. पण एका महिलेने तर फक्त पतीला परमेश्‍वर मानलेच नाही तर त्याचे मंदिर बांधून दररोज या पती परमेश्‍वराला पूजतेही. आंध्र प्रदेशमध्ये एका बायकोने आपल्या नवर्‍याचे मंदिर बांधले आहे. ती दररोज या मंदिरात त्याची पूजा करते.
आंध्र प्रदेशच्या पोडिली मंडालमधील निम्मावरम गावातील अंकी आणि पद्मावती रेड्डी हे दाम्पत्य गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यांचा सुखी संसार सुरू होता. पण चार वर्षांपूर्वी अंकी यांनी आपल्या पत्नी पद्मावतीची साथ अध्र्यावरच सोडली. ते तिच्या आयुष्यातील कायमचे निघून गेले. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नवर्‍याच्या जाण्याने पद्मावती यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येत होती. त्यांची कमी जाणवत होती. आपला नवरा आता आपल्यासोबत नाही, या जगातून तो कायमचा निघून गेला आहे यावर त्यांना विश्‍वासच बसत नव्हता. ते स्वीकारायला त्या तयारच नव्हत्या. आपला नवरा कायम आपल्याला दिसावा, आपल्यासमोर असावा, त्याची साथ आपल्याला लाभावी असे तिला वाटत होते. यातून पद्मावती यांना नवर्‍याचे मंदिर बांधण्याची कल्पना सुचली.
पद्मावती यांनी मंदिर बांधले आणि त्यात नवर्‍याची मूर्ती स्थापित केली. इतकेच नव्हे तर त्या दररोज तिथे नवर्‍याच्या मूर्तीची पूजा करतात. दर शनिवारी, रविवारी आणि पौर्णिमेला या मंदिरात विशेष पूजाही असते. नवर्‍याच्या नावाने पद्मावती अन्नदानही करतात. नवर्‍याच्या मृत्यूनंतर पद्मावती यांनी पती प्रती असलेला आदर आणि प्रेम अशा वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला आहे. यात त्यांचा मुलगा शिवशंकर रेड्डी आणि मित्र तिरुपती रेड्डी यांचीही साथ, मदत त्यांना मिळाली.