शुक्रवारी भारतात ‘फिट इंडिया फ्रीडम रन’चा शुभारंभ

210

शुक्रवारी भारतात ‘फिट इंडिया फ्रीडम रन’चा शुभारंभ

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – देशव्यापी फीट इंडिया फ्रीडम रन २.० कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर १३ ऑगस्ट ला करणार असून, उद्‌घाटनाच्या सोहळ्याला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित राहतील. याशिवाय उद्‌घाटनाच्या दिवशी विविध ७५ ऐतिहासिक स्थळांवर बहुविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा सचिव उषा शर्मा यांनी दिली.

दरम्यान,’आझादीचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी १३ ऑगस्ट रोजी ‘फिट इंडिया फ्रीडम रन च्या शुभारंभ अंतर्गत मंत्रालयाने ७.५० कोटी तरुण आणि लोकांपर्यंत पोहचण्याचे आणि त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, क्रीडा सचिव उषा शर्मा यांनी माहिती दिली की, बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, रेल्वे, आयटीबीपी, एनएसजी, एसएसबी इत्यादी सरकारी आणि अशासकीय संस्था देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. तसेच त्या पुढे म्हणाल्या, ‘देशातील विविध ऐतिहासिक ठिकाणी पहिल्या दिवशी ७५ शारीरिक कार्यक्रम आयोजित केले जातील. यानंतर, दर आठवड्याला २ ऑक्टोबर पर्यंत, ७५ जिल्हे आणि या सर्वांच्या ७५-७५ गावांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातील. एकूण, हा कार्यक्रम देशभरातील ३० हजार शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त ७४४ जिल्हे आणि त्या सर्वांच्या गावांमध्ये कर्यक्रमाचे आयोजन केले जानर आहे.मंगळवारी मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, क्रीडामंत्र्यांनी सर्व लोकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की आपण स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करत आहोत. तंदुरुस्त आणि निरोगी भारतासाठी आपण संकल्प केला पाहिजे कारण केवळ तंदुरुस्त आणि निरोगी भारतच एक मजबूत भारत बनू शकतो. म्हणून, मी सर्वांना आग्रह करतो,देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन २.० मध्ये भाग घ्या आणि त्याला लोकचळवळ बनवा, असे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.या मोहिमेद्वारे लोकांना दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करण्याचे आवाहन केले जाईल. या उपक्रमाच्या पहिला भागा अंतर्गत १५ ऑगस्ट २०२० ते २ ऑक्टोबर २०२० यादरम्यान फ्रिडम रन ला सुरुवार झाली होती. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी फिट इंडिया फ्रीडम रन’ ची संकल्पना मांडण्यात आली. महामारीच्या काळात सुरक्षित अंतर हीच ‘नवी सामान्य जीवनशैली बनली होती. अशावेळी सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करत असतानाही अत्यावश्यक गरज असलेला फिटनेस कायम राखण्यासाठी फिट इंडिया फ्रीडम रन संकल्पना पुढे आली होती.