राज्यात रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12116*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

144

राज्यात रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – हॉटेल व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. १५ ऑगस्टपासून कमी आसनक्षमतेसह रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज राज्यमंत्री मंडळाची बैठक झाली असून यात हा निर्णय घेण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली असली तरी त्यासाठी सरकारने अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्गामुळे सध्या राज्यात दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र ही वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच सरकारने हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याची माहिती आहे.

रेस्टॉरंट्स सुरु करायचे असतील तर काय आणि कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबद्दल राजेश टोपे यांनी सविस्तर सांगितलं आहे. “जे लोक जेवणासाठी आलेले असतील त्यांना वेटिंग पिरयडमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल. पूर्ण उपहारगृह सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. वेटर्सनेसुद्धा मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था ही सोशल डिस्टन्सिंगचा नियम लक्षात घेऊनच केलेली असावी. सर्व कर्मचारी तसेच मॅनेजमेंटने कोरोना लसीचा डबल डोस घेतलेला असणे गरजेचे आहे. या अटीशर्तीची पूर्तता केली असेल तरच रेस्टॉरंट्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.