राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे २० नवे रुग्ण आढळले! एकूण रुग्णसंख्या ६५ वर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12107*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

150

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे २० नवे रुग्ण आढळले! एकूण रुग्णसंख्या ६५ वर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. कारण आता राज्यात डेल्टा प्लसचे नव्याने २० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ वर गेली आहे.

नव्याने आढळलेल्या या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या नव्या २० रुग्णांमध्ये मुंबईतील ७, पुण्यातील ३ आणि नांदेड, गोंदिया, रायगड, पालघरमधील प्रत्येकी २ व चंद्रपूर, अकोल्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.स र्वाधिक ३३ रुग्ण १९ वर्षे ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत, तर त्या खालोखाल ४६ ते ६० वर्षे वयोगटातील १७ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ७ रुग्ण असून ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत.

दरम्यान, कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. राज्यात दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते. त्यातून ही नवीन माहिती समोर येत आहे.