Home Breaking News राज्यात शाळा-कॉलेज सुरु करण्याचा निर्णय स्थगित

राज्यात शाळा-कॉलेज सुरु करण्याचा निर्णय स्थगित

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12103*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

64 views
0

राज्यात शाळा-कॉलेज सुरु करण्याचा निर्णय स्थगित

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा येत्या १७ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला असताना अवघ्या २४ तासात या निर्णयाला राज्य सरकारने ब्रेक दिला आहे. शाळा-कॉलेज उघडण्याबाबतचा अंतिम निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, “शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये आम्ही स्पष्ट केले आहे. राज्यभरातील त्या- त्या भागातील प्रशासन शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील. टास्क फोर्स आणि पिडीयाट्रीक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकरी यांच्यासोबत संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल”, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.