वंजारी इंजिनियरिंग कॉलेज तर्फे कोरोना योद्धा म्हणून माजी सरपंच कमलाकर लक्ष्मणराव शेंडे यांचा सत्कार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12093*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

123

वंजारी इंजिनियरिंग कॉलेज तर्फे कोरोना योद्धा म्हणून माजी सरपंच कमलाकर लक्ष्मणराव शेंडे यांचा सत्कार

विदर्भ वतन,नागपूर- मंगळवार 10 आॅगस्ट रोजी स्व. श्री गोविंदराव वंजारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला. कॉलेजच्या अध्यक्षा सौ स्मिता अभिजित वंजारी यांच्या हस्ते माजी सरपंच कमलाकर लक्ष्मण शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थिती संचालक हेमंत सोनारे सर, प्रिंसिपल श्री चव्हाण सर, खोब्रागडे सर,सुनील कोडे माजी सरपंच, सचिन घोडे निस्वार्थ संयोजक, वषार्ताई कोडे सरपंच, मीनाताई शेंडे सरपंच, विनोदजी भुजाडे माजी उपसरपंच,उमेशजी आकरे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला
कोरोना काळात कमलाकर शेंडे यांनी कोरोना रूग्णांना औषधे देण्याचे काम आणि दररोज त्यांच्या घरी जाऊन आॅक्सिजन लेव्हल तपासणे. ज्या रूग्णाला आॅक्सिजन जी गरज आहे त्यांना आॅक्सिजन सिलेंडर मिळवून देणे, दवाखान्यात बेड मिळवून देणे, कोरोना लसीकरण साठी स्वत:च्या वाहनाने लोकांना लसीकरण केंद्रावर पोहचवणे ज्या रुग्णाकडे औषध नाही त्यांना ती औषधे पोहचवणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हे काम केल्यामुळे त्यांना कोरोना योद्धा चा पुरस्कार देण्यात आला