Home Breaking News पोलिसांनी उधळून लावल्यानंतरही आंदोलनकर्त्यांचा निर्धार कायम

पोलिसांनी उधळून लावल्यानंतरही आंदोलनकर्त्यांचा निर्धार कायम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12082*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

131 views
0

पोलिसांनी उधळून लावल्यानंतरही आंदोलनकर्त्यांचा निर्धार कायम
– विदर्भवाद्यांचे आंदोलन बुधवारला पण सुरू राहणार

विदर्भ वतन,नागपूर-स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सोमवारपासून ठिय्या आंदोलनाला बसलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप, राम नेवले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. तसेच आंदोलनस्थळ असलेल्या शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिराला सील करण्यात आले.


विदभार्चे स्वतंत्र राज्य द्या, कोरोना काळातील वीजबिलांपासून विदभार्तील जनतेला मुक्त करा आणि पेट्रोल- डिझेल, गॅस दरवाढ कमी करा या तीन मागण्यांसाठी सोमवारी आॅगस्ट क्रांतिदिनापासून विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे विदर्भ चंडिका मंदिर शहीद चौक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. ठिय्या आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. सकाळी ९ वाजेपासून आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची गर्दी जमायला लागली होती. तितक्यात दंगा नियंत्रण पोलिस पथकाच्या व्हॅन आल्या आणि त्यांनी आंदोलनस्थळाला गराडा घातला. त्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप आंदोलनस्थळी होते. त्यांना पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतले व तहसील पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. दरम्यानच्या काळात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते राम नेवले, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, युवा आघाडी प्रमुख मुकेश मासुरकर व इतर कार्यकतेर्ही आंदोलन सुरू होण्याच्या निर्धारित वेळी विदर्भ चंडिका मंदिर परिसरात पोहोचले. त्यांनी तेथे ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी चिडून आंदोलनस्थळावरील बॅनर फाडले आणि आंदोलनकर्त्यांच्या सामानाची नासधूस केली, असा आरोप समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. मुकेश मासुरकर व इतर आंदोलनकर्त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवून तहसील पोलिस स्टेशनला नेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये सुनील वडस्कर, रेखा निमजे, सुनीता येरणे, प्रशांत जयकुमार, वृषभ वानखेडे, ज्योती खांडेकर, गणेश शर्मा, उषा लांबट, शैलेश धर्माधिकारी, सुदाम राठोड, राजेंद्र आगरकर, राज ठाकूर, वीणा भोयर, डशा लांबट, राजू बोरकर, विजय मौदेकर, संजय हिंगे, अशोक हांडे, राजेंद्रसिंग ठाकूर, मुन्नाजी दुर्गे, प्यारूभाई, घीसू पाटील, रवींद्रसिंग ठाकूर, सुनील साबळे, विष्णू पाटील, अशोक पाटील, गोविंदराव चिंतावार, मोराती गडपल्लीवार, रामराव ताडपल्लीवार यांच्यासह शेकडो विदर्भप्रेमींचा समावेश होता.
पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना फरफटत ओढत नेले-
आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना फरफटत ओढत नेले. यात उषा लांबट या महिलेच्या हाताला आणि पायाला चांगलेच खरचटले. महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे यांच्याशीही झटपट झाल्याचे समितीच्या पदाधिका-यांनी सांगितले. पोलिसांनी उधळून लावल्यानंतरही आंदोलनकर्त्यांचा निर्धार कायम आहे. हे आंदोलन बुधवारी सकाळी १0 वा. पुन्हा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.