Home Breaking News आयुर्वेद संशोधनाचे अभ्यासक श्रीगुरु बालाजी तांबे यांचे निधन

आयुर्वेद संशोधनाचे अभ्यासक श्रीगुरु बालाजी तांबे यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12077*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

160 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :पुणे – आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू बालाजी तांबे यांचे आज वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.

श्रीगुरु बालाजी तांबे यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे आज निधन झाले. श्रीगुरु तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार केला. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांची संशोधन निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच, त्यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादीत न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्त्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले. लोणावळ्याजवळील कार्ला येथील आत्मसंतूलन व्हिलेज या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्या निमित्ताने राजकीय, अभिनेते, संगीत, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या आश्रमाला भेटी देत असत. परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून कार्ल्यात येत होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व त्यांनी लोकांपर्यंत पोचवले. सुदृढ नवीन पिढीसाठी श्रीगुरू तांबे यांनी गर्भसंस्कार या पुस्तकाचे लेखन केले. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले होते.