सीईटी प्रवेश परीक्षा रद्द; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – राज्यात अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने मंगळवारी घेतला आहे. इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्या, तसेच 6 आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष सीईटी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच याप्रकरणी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला असल्याचे हायकोर्टाने सांगितले.

मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सीईटी प्रवेश परीक्षा 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार होती. या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले होते. या पोर्टलवर १९ जुलैपासून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्यास सुरू केली होती. त्यानंतर अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. अशा परिस्थितीत आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीने सीईटी परीक्षेसंदर्भात मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर आज मंगळवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली आणि हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द केली.

You missed