चंद्रपुरात पीओपीच्या मूर्तींवर बंदी; नियम मोडल्यास १० हजार दंड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12057*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

381

चंद्रपुरात पीओपीच्या मूर्तींवर बंदी; नियम मोडल्यास १० हजार दंड

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,चंद्रपूर – पीओपीच्या मूर्ती पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरात पालिका प्रशासनाने पीओपीची मूर्ती आढळल्यास कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून १० हजार रुपये दंड आणि फौजदारी कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिला आहे.

गणेशोत्सव एका महिन्यावर आला असताना केंद्राने पीओपीच्या मूर्तींवर बंदी जाहीर केले आहे. त्याप्रमाणे चंद्रपूरमध्ये पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घातली आहे. अशा मूर्तींची आयात, साठा आणि विक्रीवर बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा दुकानात पीओपीची मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड केला जाणार आहे. याशिवाय दुकान सील करून डिपॉझिट जप्त केले जाणार आहे. प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी आदेशात म्हटले आहे. चंद्रपूर महापालिकेने सोमवारी मूर्तिकारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन पीओपी मूर्तींवर बंदी घातली असल्याचे सांगितले.