Home Breaking News प्रियांकाच्या परदेशातील रेस्टॉरेंटमध्ये मुंबईचा वडापाव

प्रियांकाच्या परदेशातील रेस्टॉरेंटमध्ये मुंबईचा वडापाव

0
प्रियांकाच्या परदेशातील रेस्टॉरेंटमध्ये मुंबईचा वडापाव

प्रियांकाच्या परदेशातील रेस्टॉरेंटमध्ये मुंबईचा वडापाव

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. प्रियांकाने अभिनयासह आता रेस्टॉरेंटइंडस्ट्रीमध्येदेखील प्रवेश केला आहे. भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तिच्या न्यूयॉर्कमधील ‘सोना’ या रेस्टॉरेंटची जगभरात चर्चा आहे. या हॉटेलमुळे अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना आणि तेथील भारतीयांना अस्सल भारतीय पदार्थांची चव चाखायला मिळते आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरेंटमध्ये मुंबईचे स्ट्रीट फूडदेखील मिळते. यातील वडापाव, समोसा, पाणीपुरी हे पदार्थ तिथे लोकप्रिय झाले आहेत.

आतापर्यंत रेस्टॉरेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. प्रसिद्ध निर्मात्या लोला जेम्स यांनीदेखील अलिकडेच प्रियांकाच्या या रेस्टॉरेंटला भेट दिली. यावेळी त्यांनी वडापावची चव चाखली. तसेच त्यांनी भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. याबाबत त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर करत म्हटलंय, ‘न्यूयॉर्कमध्ये असलेले हे सोना अप्रतिम चवीचे रेस्तराँ आहे. येथे रुचकर आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद नक्की घ्या.’

दरम्यान, या रेस्टॉरेंटमधील पदार्थ जितके चवदार आहेत, तितक्याच त्यांच्या किंमतीही भारी आहेत. मुंबईत ज्या वडापावची किंमती ३० रुपयांच्या वर जात नाही, तो वडापाव प्रियांकाच्या रेस्टॉरेंटमध्ये खायचा असेल तर तब्बल १४ डॉलर्स म्हणजे १ हजार ३९ रुपये मोजावे लागतात.