Home Breaking News भुमी दादिलवार हिची उत्तुंग भरारी

भुमी दादिलवार हिची उत्तुंग भरारी

296 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – मागील दोन शैक्षणिक सत्र हे कोरोना रोगाच्या सावटाखाली गेले़ याचा सर्वसामान्यांसोबतच विद्यार्थांच्या अभ्यासक्रमावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला़ कोरोना रोगाचे दडपण असतांनाच काही विद्यार्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करित शैक्षणिक गुणवत्तेच भरारीचख घेतलेली आहे़ भुमी गिरीश दादिलवार हिने १२ व्या वर्गात सर्वोत्तम गुण पटकाविले तसेच नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या पहिल्याच फेरीत आपले नाव निश्चीत केले़ यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे़ नुकताच बारावीचा निकाल जाहिर झाला़ भुमीने १२ वीत ९५ टक्के गुण पटकाविले. तसेच नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्याच फेरीत तिने आपल्सा नावाची नोंद केली़ राष्ट्रीय स्तरावर वकील वर्गासाठी  clat ची परीक्षा झाली, त्यामध्ये ओबीसी वर्गात भुमी clat पास झाली आणि पहिल्या फेरीत तिचा नॅशनल law university मध्ये नोंद झालेली आहे. वकील शेत्रात प्रतिष्ठेची असलेली परीक्षा आहे़ यामध्ये भारतीय स्तरावर वकील विद्यार्थी निवडल्या जातात. भुमी दादिलवार हिने आपल्या यशाचे श्रेय वडिल अँड़ गिरीश दादिलवार, आई तसेच कुटुंबियांसह गुरूजनांना दिले़ भुमीच्या या यशाबद्दल सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे़