Home Breaking News ब्लूटूथ हेडफोनचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू

ब्लूटूथ हेडफोनचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू

0
ब्लूटूथ हेडफोनचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू

ब्लूटूथ हेडफोनचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :जयपूर-फोन माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. फोन वापरणारे बहूतेक जण हेडफोनही वापरतात. तुम्ही, कुठेही केव्हाही हेडफोन लावून गाणी ऐकू शकता, व्हिडिओ पाहू शकता. हेडफोनमुळे फोनचा आवाज बाहेर येत नसल्याने इतरांना कोणताही त्रास होत नाही, शिवाय आपल्याला नीट ऐकू देखील येतंय. सध्या बाजारात वायर, वायरलेस, ब्लूटूथ अशा अनेक प्रकारचे हेडफोन उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयी आणि आवडीनुसार हेडफोन वापरतात. हेडफोन वापरण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेदेखील आहेत. हेडफोन लावल्यानंतर बाहेरचा आवाज कमी ऐकू येतो. त्यामुळे रस्त्यावर चालताना किंवा रस्ता ओलांडताना वाहनांचा आवाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. ब्लूटूथ हेडफोन कानातच फुटल्याने एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. जयपूर जिल्ह्यातील उदयपुरा गावात शुक्रवारी ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कुमार नागर नावाचा हा तरुण घरीच स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. तो चाजिर्ंगला लावलेले हेडफोन वापरत होता. अचानक हेडफोनमध्ये स्फोट झाला आणि राकेश बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राकेशच्या दोन्ही कानांना जखमा झाल्या होत्या. तर, डॉक्टरांनी सांगितले की, राकेशला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हेडफोनचा स्फोट झाल्याने त्याला हृदय विकाराचा धक्का आला आणि त्यामुळे तो मरण पावला.
फोन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चाजिर्ंगला लावून वापरू नये. वीजेचा प्रवाह सुरू असल्याने त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल किंवा इतर डिव्हाईस वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.