शनिवारी ईडीने वर्धा मार्गावर विमानतळाजवळ असलेल्या देशमुख यांच्या हॉटेल ट्रॅवोटेल वर घातली धाड – महत्वाची कागदपत्रेही जप्त

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12028*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

119

शनिवारी ईडीने वर्धा मार्गावर विमानतळाजवळ असलेल्या देशमुख यांच्या हॉटेल ट्रॅवोटेल वर घातली धाड

– महत्वाची कागदपत्रेही जप्त

विदर्भ वतन,नागपूर-माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या फेटरी येथील एनआयटी महाविद्यालयावर शुक्रवारी धाड टाकल्यानंतर शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने देशमुखांच्या वर्धा मार्गावरील ट्रॅवोटेल या हॉटेलवर धाड घातली. अनिल देशमुख पसार झाल्यापासून ईडी त्यांचा शोध घेण्यासाठी वारंवार त्यांच्या प्रतिष्ठांनावर धाड घालून कारवाई करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थाद्वारे संचालित नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने धाड घातली. यावेळी काही महत्त्वाचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले होते. ईडीने चारवेळा समन्स बजाविल्यानंतरही देशमुख पितापुत्र चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित झाले नाही. त्यांना ईडीसमोर उपस्थित होण्यासाठी वारंवार नोटीस बजाविण्यात येत आहे. मात्र ते ईडीसमोर उपस्थित झाले नाही. यामुळे देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीने त्यांच्याशी संबंधित ठिकाणी धाडी टाकणे सुरू केले आहे. शनिवारी ईडीने वर्धा मार्गावर विमानतळाजवळ असलेल्या देशमुख यांच्या हॉटेल ट्रॅवोटेल वर धाड घातली. यावेळी हॉटेलच्या खोल्यांमध्ये जाऊन देशमुख यांचा शोध घेण्यात आला. येथून काही कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतले असल्याचे हॉटेलच्या कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
शनिवारी त्यांच्या महाविद्यालयात ईडीच्या पथकाने साडे तीन तास तपासणी केली होती. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या हाती लागली होती. शुक्रवारी ईडीच्या चार अधिका-यांनी देशमुख यांच्या नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयावर धाड घातली होती. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे २0 जवानही यावेळी त्यांच्यासोबत होते. एनआयटी महाविद्यालय हे श्री साई शिक्षण संस्थेद्वारे संचालित आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष अनिल देशमुख आहेत. धाडीच्या वेळी सीआरपीएफच्या जवानांनी महाविद्यालयाला पूर्णपणे घेरले होते. यावेळी महाविद्यालयाच्या कर्मचा-यांनाही प्रश्न विचारण्यात आले.