
नीरज चोप्राने भारताला मिळवून दिले स्वर्णपदक
-
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने घडविला इतिहास
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली-भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. याचबरोबर, लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम देखील मोडीत काढला. २0१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती. त्यानंतर आता २0२१ मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदके जिंकत, लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणार्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोगोर्हेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.0३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेर्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. चेक रिपब्लिकच्या वडलेजनं ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळाले. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत आणि कांस्य पदक मिळाले. भारत १९00 पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अँथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९00 साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ८ रजत आणि १५ कांस्य पदकं पटकावली आहेत.
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक निश्चित केले. अँथलॅटिक्समधले भारताचे हे पहिले सुवर्ण पदक आहे. यापूर्वी शूटर अभिनव बिंद्राने २00८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पहिले सुवर्ण पदक जिंकले होते. अंतिम फेरीत त्याने पहिल्या प्रयत्नात ८७.3 मीटर भालाफेक करत आपल्या कामगिरीत सुधारणा केली. सध्या तो अंतिम यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल र्जमनीच्या जे वेबेर होता. त्याने ८५. ३0 मीटर लांब भाला फेकला. ८२.५२ मीटर भालाफेक करत र्जमनीचाच जे व्हेटेर तिसर्या स्थानावर राहिला. त्यानंतर नीरज चोप्रा याने आपल्या दुसर्या प्रयत्नात ८७.५८ मीटर भालाफेक करत आपली सुवर्ण पदकाची दावेदारी अजून बळकट केली. त्यानंतर तिसर्या प्रयत्नात त्याने ७६.७९ मीटर भालाफेक केली. मात्र दुसर्या फेकीवेळी ८७.५८ मीटर भाला फेकल्याने ती फेकी सर्वोच्च म्हणून ग्राह्य धरली जाते.

