Home Breaking News सांगलीत ऑगस्ट क्रांतिदिनी शिक्षकांचे धरणे आंदोलन

सांगलीत ऑगस्ट क्रांतिदिनी शिक्षकांचे धरणे आंदोलन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12017*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

47 views
0

सांगलीत ऑगस्ट क्रांतिदिनी शिक्षकांचे धरणे आंदोलन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : इस्लामपूर – ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी देशभरातील शेतकरी संघटना, कामगार संघटना, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकदिवशीय देशव्यापी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय सांगली जिल्ह्यातील शिक्षक भारतीने घेतला आहे.

सांगली शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे म्हणाले की सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सदस्य आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी कार्यालय सांगली येथे दुपारी २ ते ४ या वेळात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भारती संघटनेच्यावतीने हे आंदोलन केले जाणार आहे.कोविडचे सर्व निर्देश व नियम यांचे काटेकोरपणे पालन करून हे आंदोलन करण्यात येणार आहे.वाळवा तालुक्यासहित जिल्ह्यातील शिक्षक वर्गाचा या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.