कोरोनात भाविकांची गर्दी नडली; तुळजाभवानीची ३ उपमंदिरे सील

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12012*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

193

कोरोनात भाविकांची गर्दी नडली; तुळजाभवानीची ३ उपमंदिरे सील

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :तुळजापूर – कोरोनामुळे तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी देवीच्या महाद्वाराचे आणि मंदिराच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रोज येथे येतात. याशिवाय मंदिर परिसरात उपदेवतांची मंदिरे खुली आहेत. तेथे भाविकांची मोठी गर्दी होते. त्यात नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी तुळजाभवानी मातेच्या परिसरातील ३ देवी-देवतांची मंदिरे सील केली आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी घातलेले काही निर्बंध सरकारने शिथिल केले असले तरी अद्याप मंदिरांना परवानगी दिलेली नाही. असे असताना तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरातील अन्नपूर्णा देवी, टोळ भैरव आणि मातंगी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. तेथे कोरोना प्रतिबंधक उपाय योजना आणि नियमांची पायमल्ली केली जात होती. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिराची पाहणी केली. तेव्हा त्यांनाही तेथे भाविकांची गर्दी आढळली. त्यामुळे तहसीलदारांनी ही तीन मंदिरे सील केली आहेत. तुळजाभवानीचे मंदिर बंद असले तरी तेथे दररोज धार्मिक विधी आणि पूजाअर्चा सरकारी नियम पाळून केले जात आहेत.