कुहीच्या सराफा दुकानातील रोख व आभूषण लंपास

विदर्भ वतन,कुही-स्थानिक शहरातील भरवस्तीत असलेल्या पटेल कॉम्प्लेक्समधील भरणे ज्वेलर्सचे कुलूप न तोडता शटर वाकवून अज्ञात चोरट्याने दुकानातील रोख रकमेसह ५७ हजार ४00 रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
शहरातील पटेल कॉम्प्लेक्समध्ये भरणे यांचे ज्वेलर्स चे दुकान आहे. याच दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून दुकानातील चांदीच्या पायपट्ट?ा – २८ हजार रु., लहान मुलांचे चांदीचे वाळे – ३२00/-रु.चांदीचे कडे -१८00/-रु. सोन्याचे कानातील टॉप्स -0९ हजार रुपये व ड्रॉवरमधील २0 हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ५७,४00 /- रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे दोन्ही कुलूप जसेच्या तसा ठेवत दुकानाचे शटर मधोमध वाकवून चोरी करण्यात आल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करीत अज्ञात चोरट्यांविरोधात कलम ४५४, ४५७ व ३८0 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव पुजारीसह संदीप गुट्टे करीत आहेत. यासोबतच कुही-मांढळ रस्त्यावरील चिपडी गावाजवळ असलेल्या सालासार जिनिंगमध्येसुद्धा चोरीची घटना घडल्याची माहिती कुही शहराचे बिट जमादार नामदेव पुजारी यांनी दिली.

You missed