अपहरणाच्या आरोपींना इमामवाडा पोलिसांनी तासाभरात केले जेरबंद

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11998*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

121

अपहरणाच्या आरोपींना इमामवाडा पोलिसांनी तासाभरात केले जेरबंद

विदर्भ वतन,नागपूर-वस्तीतील मुलांनी वस्तीतील मुलीचे अपहरण करून ३0 लाखांची खंडणी मागितल्याची घटना शुक्रवारी सकाळी चंदननगर भागात घडली. आरोपींचा एक तासातच छडा लावून मुलीला सुखरूप घरी सोडण्यात आले. तर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, इमामवाडा हद्दीतील चंदननगर परिसरातील एका १९ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. मुलगी शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेली होती. तिच्याच वस्तीत राहणा-या काही मुलांनी युवतीचे चारचाकी गाडीतून अपहरण केले.
दरम्यान, आरोपींनी मुलीच्या घरच्यांना फोन करून ३0 लाखांची खंडणी मागितली. मुलीचे अपहरण झाल्याचे कळताच मुलीच्या घरच्यांनी लगेच इमामवाडा पोलिस ठाणे गाठून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून लगेच तपासाला सुरुवात केली. घटना घडल्याच्या अवघ्या एका तासात मुलगी सक्करदरा हद्दीत मिळून आली. त्यानंतर आरोपी ऋषिकेश कोरके (२१) आणि चिकू चौहान (२१) दोन्ही रा. चंदननगर यांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि मुलगी एकमेकांना ओळखत होते का? तसेच अपहरणामागे दुसरे काही कारण होते, हे तपासात पुढे येणार आहे.