Home Breaking News १३५ देशांत डेल्टाचा कहर! एका आठवड्यात ४० लाख नवे रुग्ण

१३५ देशांत डेल्टाचा कहर! एका आठवड्यात ४० लाख नवे रुग्ण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11993*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

83 views
0

१३५ देशांत डेल्टाचा कहर! एका आठवड्यात ४० लाख नवे रुग्ण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थानवी दिल्ली – कोरोनाच्या डेल्टा या विषाणूच्या प्रकाराने जगातील १३५ देशांमध्ये हाहाकार माजवला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. जगातील १३२ देशांमध्ये बीटा आणि ८१ देशांमध्ये गामा हा विषाणूचा प्रकार आढळला होता. १८२ देशांमध्ये अल्फा प्रकार आढळला होता, असे जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. मात्र सर्वप्रथम भारतात सापडलेल्या डेल्टाने आता १३५ देशांमध्ये कहर केला आहे. २६ जुलै ते १ ऑगस्ट या आठवड्यात या देशांमध्ये ४० लाख कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याचे संघटनेने म्हटले आहे.

डब्ल्यूएचओने जागतिक महामारी विज्ञान अपडेट जारी केले आहे. त्यात त्यांनी पूर्व मध्य आणि पश्चिमी प्रशांत क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. ही वाढ अनुक्रमे ३७ आणि ३३ टक्के आहे. मात्र दक्षिण-पूर्व आशियाई क्षेत्रांमध्ये कोरोना रुग्णवाढ ९ टक्के आहे. या आठवड्यात कोरोनाच्या जगातील मृतांची संख्या ६४ हजार आहे. ती गेल्या आठवड्याच्या तुलनेत ८ टक्के कमी आहे. गेल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. तेथे एक आठवड्यात ५ लाख ४३ हजार ४२० कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. हे प्रमाण ९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारतात गेल्या आठवड्यात २ लाख ८३ हजार ९२३ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. भारतातील ही रुग्णवाढ ७ टक्के आहे. इंडोनेशियात २ लाख ७३ हजार ८९१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. ही रुग्णावाढ ५ टक्के आहे. ब्राझीलमध्ये २ लाख ४७ हजार ८३० कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. ही रुग्णवाढ २४ टक्के आहे. इराणमध्ये २ लाख ६ हजार ७२२ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून ही रुग्णवाढ २७ टक्के आहे, असे जागतीक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.