सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11984*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

110

सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थामुंबई – मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा काल निनावी फोन आला होता. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मात्र दोन तासांच्या शोधमोहीमेनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळूल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. शुक्रवारी रात्री 10 नंतर हा प्रकार घडला.

शुक्रवारी रात्री 9 : 45 दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. या फोनवरुन एका व्यक्तीनं पोलिसांना मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा रेल्वे स्थानकं आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणी दाखल झालं. बराच वेळ शोधाशोध करण्यात आली. मात्र, कोणतीही स्फोटकं किंवा संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळून आली नाही. पोलिसांनी ज्या नंबरवरुन फोन आला त्या नंबरवर फोन केला. त्यावेळी, समोरच्या व्यक्तीनं माझ्याकडे जी माहिती होती, ती मी तुम्हाला दिली. आता मला डिस्टर्ब करुन नका, असं सांगितलं आणि फोन स्विच ऑफ केला. त्याचा फोन बंद असल्यामुळं पोलिसांना त्याचा शोध घेणं काहीसं कठिण होत गेलं.

दरम्यान, बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब शोधक पथक तातडीने दाखल झालं. यामुळे रेल्वे स्थानकावर काही काळ खळबळ उडाली होती. मेन लाईन आणि वेटिंग हॉल रिकामा करण्यात आला. तसंच स्थानकावर सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉल यापासून तिकीट घर अशा सर्व ठिकाणींची चौकशी केली गेली.