Home Breaking News सचिन वाझेचा जामीन अर्ज एनआयए न्यायालयाने फेटाळला

सचिन वाझेचा जामीन अर्ज एनआयए न्यायालयाने फेटाळला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11959*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

92 views
0

सचिन वाझेचा जामीन अर्ज एनआयए न्यायालयाने फेटाळला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई –  अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि रियाझ काझी यांचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच जामीन अर्ज दाखल करून न्यायलयाचा वेळ वाया गेल्याबाबत न्यायधिशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आरोपपत्र सादर करण्यासाठी आणखी एका महिनाचा वेळ देण्याची मागणीही न्यायालयाने मंजूर केल्याने एनआयएला मोठा दिलासा मिळाला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणांना कोणत्याही प्रकरणात 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. मात्र तपास यंत्रणा अपयशी ठरल्यामुळे आपल्याला डीफॉल्ट जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत सचिन वाझेसह अन्य दोन पोलीस अधिका-यांनी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.