
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नवी दिल्ली-टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, या विजयामुळे त्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये विशेषत: आपल्या तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;”ऐतिहासिक ! हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत कोरला जाईल.कांस्य पदक जिंकल्याबद्दल आपल्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये विशेषत: आपल्या तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.”

