Home आध्यात्मिक श्री गजानन महाराज मंदिरांचे विश्‍वस्त शिवशंकर पाटील यांना सनातन संस्थेकडून श्रद्धांजली !

श्री गजानन महाराज मंदिरांचे विश्‍वस्त शिवशंकर पाटील यांना सनातन संस्थेकडून श्रद्धांजली !

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11951*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

53 views
0

श्री गजानन महाराज मंदिरांचे विश्‍वस्त शिवशंकर पाटील यांना सनातन संस्थेकडून श्रद्धांजली !

भक्तांद्वारे मंदिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन पाहणारे शिवशंकर पाटील यांचा आदर्श सर्व मंदिर विश्‍वस्तांनी घ्यावा !

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,शेगांव – कथित गैरव्यवस्थापनाच्या नावाखाली महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक मोठी मंदिरे स्वतःच्या नियंत्रणात घेतली. अनेक मंदिरांतील भक्तांचे विश्‍वस्त मंडळ विसर्जित केले. त्या वेळी भक्तांच्या माध्यमांतून सचोटीने कार्य करून मंदिर व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळून मंदिर सरकारीकरणाला पर्याय निर्माण करणारे शेगांव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकर पाटील यांनी सर्व हिंदू आणि मंदिर विश्‍वस्त यांच्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याचा आदर्श सर्व मंदिरांच्या विश्‍वस्तांनी घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने कै. शिवशंकर पाटील यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतांना केले.

‘हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन निधर्मी सरकारने नव्हे, तर सश्रद्ध भक्तांच्या हातातच असायला हवे’, ही भूमिका प्रथमपासून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी मांडली आहे. या भूमिकेला अनुरूप असे कार्य ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकर पाटील यांनी केले आहे. आज याच उद्देशाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील मंदिरांचे विश्‍वस्त, पुजारी, पुरोहित आणि अधिवक्ते हे मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात संघटित होत आहेत. तसेच सरकारीकरण झालेल्या मंदिरातील घोटाळे आणि भ्रष्टचार उघड करून त्याविरोधात लढा देत आहेत.

शिवशंकर पाटील यांनी नेहमीच सनातनच्या धर्मरक्षणाच्या कार्याला सहकार्य केले होते. महाराष्ट्र शासन आणू पाहत असलेल्या मंदिर सरकारीकरण, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधातही त्यांनी मोलाचे साहाय्य केले होते.