आयर्लंड मध्ये प्राचीन शिवलिंग?

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11942*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

185

आयर्लंड मध्ये प्राचीन शिवलिंग?

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :आयर्लंड – आयर्लंड कौंटी मिथ येथे एक तारा हिल नावाच्या जागी असलेली दगडाच्या चौकोनी विटांमध्ये स्थापित गोलाकार उंच आकृती कधी आणि कुणी स्थापन केली याचा अचूक अंदाज अजून वर्तविता आलेला नसला तरी ही रहस्यमयी आकृती म्हणजे प्राचीन शिवलिंग असावे अशी शंका घेण्यास खुपच वाव आहे. लिया फेईल म्हणजे भाग्य पत्थर असे या आकृतीला म्हटले जाते आणि त्याची पूजा केली जाते हे विशेष.

१६३२ ते १६३६ इसवी पूर्व फ्रांस भिक्षु यांच्याकडे असलेल्या काही प्राचीन कागदपत्रात म्हणजे ‘ड माईनर्स ऑफ द फोर मास्टर्स’ नुसार काही दैवी शक्ती असलेल्या एका गटाचा नेता तुथा डी डेनन याने याची स्थापना केली असावी. याच गटाला कांस्य धातू बनविण्याचे प्रयोग केल्याचे श्रेय दिले जाते. तुथा डी देनन याचा अर्थ देवी दानूची मुले. १८९७ ते १७०० बीसी या काळात क्रिशन भिक्षुनी या दगडी आकृतीला प्रजननखामातेचे प्रतिक मानले होते आणि त्या काळात हे स्थळ इतके प्रसिद्ध होते की ५०० इसवी पूर्व सर्व आयरिश राजांचा राज्याभिषेक याचा वापर होत असे.

युरोपीय परंपरेप्रमाणे देवी दानू ही नदी देवी आहे. या देवीचा पिता दागदा हा सर्वात चांगला राजा होता. विशेष म्हणजे वैदिक परंपरेत दानू देवी ही दक्ष राजाची मुलगी कश्यप मुनींची पत्नी होती. ती नदीची देवी होती. दक्ष राजाची दुसरी मुलगी सती. सती भगवान शंकराची पत्नी.

कौंटी मिथ येथे असलेली ही दगडी आकृती शिवलिंग प्रतिमेशी खुपच जुळणारी आहे. हे प्राचीन शिवलिंग असावे असा दावा केला जातो. जगभर शिवपुजेशी प्रचलित हजारो अवशेष आजही विखुरले गेले आहेत हे सत्य या संदर्भात नजरेआड करता येणार नाही.