Home Breaking News बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार

बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11921*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

49 views
0

बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – बारावीनंतर पुढील उच्च शिक्षणासाठी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मात्र यंदा कोरोना असल्यामुळे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार नाही आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना बारावीच्या मार्कांवरच कॉमर्स , सायन्स आणि आर्टस्मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासंबंधीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले की , दरवर्षीच्या बारावीच्या निकालापेक्षा यंदा बारावीचा निकाल तब्बल नऊ टक्के जास्त लागला आहे त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठं वाढ झाली आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कॉलेजमध्ये तुकड्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. विविध अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम याकरता प्रदेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र सीईटी देणं अनिवार्य असणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटी घेण्यात येणार आहे. यासाठी CET परीक्षेच्या केंद्रांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. साधारणतः 350-400 केंद्रं यासाठी असणार आहेत.

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे कोविडची स्थिती बघून पुढचं शैक्षणिक वर्ष-फिजीकली सुरू करणार अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. हे शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार याबद्दलचा निर्णय 8 दिवसात घेणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होताना निकष वेगळे असतील असंही त्यांनी म्हंटलं आहे.ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होतपर्यंत त्यांना संपूर्ण शुल्क माफ असणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावं लागणार नाही असे उदय सामंत म्हणाले.