शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11916*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

129

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, बुलडाणा – श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८२व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शेगाव इथे कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. गेल्या तीन दिवसांपासून शिवशंकर पाटील यांची प्रकृती खालावली होती. आज डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान अंत्यविधीबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी घराजवळ असलेल्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र सध्या भक्तांची गर्दी वाढणार असल्याच्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत असून, शिवशंकर पाटील यांच्या निधनांची बातमी समजताच विरोधी पक्षनेते आणि राज्याची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते.त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’

तर दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.