पूरग्रस्तांना टायगरग्रुपचा मदतीचा हात! वाडीतील युवकांनी केले धान्य किटचे वाटप

128

विदर्भ वतन न्युज पोर्टल –‘आम्ही मदत करू तर नाव दुसºयाच होईल ही भावना सोडून खुल्या मनाने मदत करावी’, कारण आता कुणाला नाव ठेवायची नाही तर माणसाने माणुसकी दाखवायची वेळ आली आहे़
सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक आहेत, मात्र संकटकाळी मदतीचा हात देणारे मोजकेच असतात़ टायगरग्रुप वाडी शहरतर्फे ‘एक हात मदतीचा,एक हात माणुसकीचा आपला महाराष्ट्रासाठी’ या मोहिमेअंतर्गत काही दिवसांपुर्वीच झालेल्या पुरामुळे आर्थिक टंचाईत सापडलेल्या कुटुंबियांना मदत करण्यात आली़ कोकण, कोल्हापूर, सांगली पूरग्रस्त भागात महापुराने सगळे जन-जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे़ तेथील पूरग्रस्त पीडितांना मदत मिळावी या हेतुने तांदूळ, पीठ,तेल, मिठ, मिरची, हळद ,बिस्किट पाकीट,आलू,कांदे याप्रकारे नागरिकांनी धान्याचे सहकार्य केले़ नागरिकांच्या पुढाकारातून गोळा झालेली सामुग्री टायगर ग्रुपच्यावतीने पूरग्रस्तांना एका विशिष्ट वाहनाच्या माध्यमातून पुरविण्यात आली़
यावेळी वाडी येथील टायगर ग्रुपचे कार्यकर्त्यांनी वितरणासाठी विशेष सहकार्य केले़ या उपक्रमाचे संयोजन टायगर ग्रुप (पश्चिम नागपूर)वाडी शहर रवी अजित, टायगर ग्रुप वाडी शहर गुलशन शेंडे,देवेंद्र शेंडे, रामकिशोर रहांगडाले, कृष्णा पटले, सुरज कातडे, सिद्धार्थ मेश्राम, विजय कटरे, रामेश्वर अजित, कमल तायडे, समीर काकडे तसेच समस्त टायगर ग्रुप वाडी शहर यांनी केले़